संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान दुप्पट करणार ; हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

 

मुश्रीफ म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान दुप्पट करण्यासोबत मागील पाच वर्षांत बंद झालेल्या निराधार योजनेची पेन्शन योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा २१ हजारांवरुन ५० हजार रुपये करण्यात येईल. तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठांचा मदतनिधी मासिक एक हजार रुपयांवरुन दुप्पट म्हणजे दोन हजार रुपयांपर्यंत वाढवला जाणार आहे. महापूरग्रस्त महिलांनी मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांच्याकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत,असेही मुश्रीफ यांनी सांगीतले.

Protected Content