शेगाव येथे फागोत्सव उत्साहात; निशान यात्रेत मधुर भजनांनी श्रोते झाले मंत्रमुग्ध

शेगाव प्रतिनिधी । खाटू नरेश श्याम बाबा फागन उत्सवात आज शेगाव शहरातून निशान यात्रा काढण्यात आली. यावेळी भक्तांनी विविध मधुर भजनांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

शेगाव येथे शुक्रवार ६ मार्च रोजी खाटू नरेश श्याम बाबा यांचा नववा फागुन उत्सव आयोजित करण्यात आला होता. खाटू श्याम भक्त परिवारातर्फे ६ रोजी सकाळी ९ वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून शेकडो टाळकरी महिला सजविलेल्या रथामध्ये खाटू श्याम यांची निशाण यात्रा काढण्यात आली. श्रींच्या मंदिरातून सुरू झालेली ढोल ताशाच्या गजरात निघालेली ही निशाण यात्रा शेगाव शहरातील तिला लहुजी वस्ताद चौक संत गाडगेबाबा चौक जुना गजानन महाराज मंदिर रोड प्राचीन हनुमान मंदिराजवळून गांधी चौक मेनरोड छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने चालत जाऊन श्याम धाम अग्रेशन भवन या ठिकाणी पोहोचली.

या निशाण यात्रेचे मार्गामध्ये शाम भक्ताकडून ठिकाणी पूजन करण्यात आले व धार्मिक परंपरेने स्वागत करण्यात आले. या निशाण यात्रेत मोठ्या संख्येने खाटू श्याम भक्त सहभागी झाले होते. संध्याकाळी ५ वाजता श्याम धाम अग्रसेन भवन या कार्यक्रमस्थळी एक श्याम श्याम बाबा के नाम हा संगीतमय भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याठिकाणी खाटू नरेश बाबा शाम यांच्या शिशचे विशेष शिंगार करून स्थापित करण्यात आले होते थे भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरत होते हे विशेष. या भजन संध्यात दिल्ली येथील प्रख्यात भजन गायिका सुश्री शिखा भार्गव आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथील भजन सम्राट सौरभ शर्मा या दोघांनी आपल्या सुमधुर वाणीने, ‘कीर्तन की है रात, बाबा आज थाने आनो कीर्तन की है रात कीर्तन की है, आदी मधुर भजनामुळे संपूर्ण वातावरण खाटू श्याममय झालेले दिसत होते. उपस्थित महिला व पुरुषांनी सुद्धा या मधुर भजनावर जागेवरच नुत्य करून वातावरण अधिकच धार्मिक बनविले. ७ मार्च रोजी अग्रसेन भवन परिसरात खाटू श्याम भक्त परिवारातर्फे होमहवन करुन ५६ भोगचे दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेगाव शहरासह खामगाव, नांदुरा, अकोला, अमरावती, जळगाव, जामोद, संग्रामपूर इत्यादी जिल्हा व तालुक्यातील खाटू श्याम भक्तांची मोठ्या संख्येने सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. फाग उत्साहात महाप्रसादाच्या यशस्वितेसाठी खाटू श्याम परिवारातील सरला खंडेलवाल, जयश्री सारडीवालसह महीलानी परिश्रम घेतले.

Protected Content