आ. महाजन यांची लोकप्रियता लाडवंजारी यांनी आजमावू नये : दीपक सूर्यवंशी

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे भाजपा नेते आ. गिरीश महाजन यांच्यावर टीका करत जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देवू अशी टीका केली होती. यास भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे उत्तर देत आ. महाजन यांचे सेवा, कार्य, कर्तुत्व, प्रतिमा, लोकप्रियता लाडवंजारी यांनी आजमावू नये असा इशारा दिला आहे.

पत्रात ते म्हणतात, “भाजपमध्ये खंबीर नेतृत्व उरलेल नाही” असे म्हणत माजी मंत्री खडसेवर टीका करणाऱ्या आणि आ.गिरीश महाजनां यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे अशोक लाडवंजारी यांनी दिला आहे. लाडवंजारी यांना जे नाव मिळाले आहे. ते भाजप व भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मेहनत आणि दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रभावाचे फळ आहे. आ. गिरीश महाजन यांचे सेवा कार्य, कर्तुत्व, प्रतिमा, लोकप्रियता लाडवंजारी यांनी आजमावू नये.

“जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार महाजनांना त्यांची जागा दाखवून देऊ…” ही त्यांची भाषा त्यांच्या अंगाशी येईल जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत लाचाराना हाताशी धरून बदमाशी करणे आणि तुल्यबळ उमेदवारांचे अर्ज बाद करणे पक्षपात करणे, मतदारांना घरोघरी पैसे पाठवत विकत घेण्याचा प्रयत्न करणे हे लपून राहिलेले नाही. रावेर मतदार संघात जाहीर माघारीच्या महागड्या जाहिरात प्रसिद्ध करून महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराला पराभूत करणे, पहिल्या तीनमध्ये बाद करून घेणे यामागची कारणे शोधत आपल्या कथित नेत्यांना जाब विचारण्याची हिम्मत लाडवंजारी व अन्य कोणी दाखवतील का ? असेही असे आमचे आव्हान आहे. गटबाजीने सध्याचे पद मिळवलेल्या लाडवंजारी यांनी अशी हिंमत दाखवावी” असे आव्हान पत्राद्वारे जळगाव भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!