जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्यास बडतर्फ करा : संजय वराडे यांची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जि. प. अधिकाऱ्याने जीवे ठार मारण्याची धमकी भ्रमणध्वनीद्वारे दिली असून  त्यास कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी कॉग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष संजय वराडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच श्री वराडे यांनी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

 

संजय वराडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंचायत राज कमिटी जिल्हा दौऱ्यावर असतांना श्री. वराडे यांनी कमिटीकडे दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी सिंचन विभागातील भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषदेतील अधिकारी जितेंद्र विसपुते यांच्या विरोधात पंचायत राज कमिटीमध्ये अध्यक्ष यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केल्या आहेत. परंतु, श्री. विसपुते यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता मयुर कोकाटे यांनी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संजय वराडे यांना भ्रमणध्वनीद्वारे तक्रार मागे घेतली नाही तर तुझा मर्डर करुन टाकू, आमदार, खासदार असो आम्ही घाबरत नाही अशी धमकी दिली. याबाबत श्री. वराडे यांच्या तक्रारीवरुन कनिष्ठ अभियंता मयुर कोकाटे रा. भुसावळ यांच्या विरोधात मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, श्री. वराडे यांनी याबाबत नाशिक विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनाही निवेदन दिले आहे. यात त्यांनी संबंधित अधिकार्‍यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत व त्यांना पदावरुन कायमस्वरुपी बडतर्फ करावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/462541278762192

 

Protected Content