धाबे जि.प.शाळेत जागतिक महिला दिवस उत्साहात

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील धाबे जिल्हा परिषद शाळेमध्ये आज ८ मार्च हा जागतिक महिला दिवस नारी सन्मान व नारी शक्तीचे प्रतिक म्हणुन साजरा करण्यात आला आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण ग्रामिण भागात व विशेष करून आदिवासी वस्तीत याबाबत उदासिनता दिसुन येते. हेच नेमके हेरून शाळेचे राज्य शिक्षक व मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी जागतिक महिला दिवसाचा आगळा वेगळा कार्यक्रम शेळावे केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व विदयार्थी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पाडला.

अगोदर मुख्याध्यापक साळुंखे यांनी गांवातील गजानन हायस्कुल निकिता युवराज भिल हिला नारी सन्मान म्हणुन एक दिवस शाळेचे मुख्याध्यापिकापद देण्यात आले. तिच्याहस्ते तिची आई आई दुर्गा भिल आशासेविका यांचा उत्कृष्ट वैदयकिय सेवेबदल, म्हाळसा भिल यांना उत्कृष्ट अंगणवाडी सेविका कार्य व संगिता भिल यांनी दोन मुलींवरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या म्हणुन साडीचोळी, भेटवस्तु, शाल, श्रीफळ, पुष्प देऊन यथोचित सत्कार केला.

गावात नवीन विवाह करून आलेल्या व नव मतदार युवतींचे मतदार नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले. केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांनी महिलांनी आता न घाबरता प्रत्येक क्षेत्रात भाग घ्या. कुटुंब मर्यादित व व्यसनमुक्त कसे राहिल आणि मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे मार्गदर्शन केले. महिला सन्मानाचा व कौतुकाच्या या कार्यक्रमाचे महिला ग्रामस्थांना अप्रुप वाटले.

सुत्रसंचलन वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी तर गुणवंतराव पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील यांनी महिलांना साडी चोळी सप्रेम भेट पाठविल्या म्हणुन त्यांचे व उपस्थित सर्वांचे आभार मनवंतराव साळुंखे यांनी मानले. मुख्याध्यापिका निकिता भिल यांनी उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.

Protected Content