धकाधकीच्या जीवनात खेळाशिवाय पर्याय नाही ; एस.पी.वाघ

WhatsApp Image 2019 04 11 at 1.19.06 PM

अमळनेर (प्रतिनिधी ) सध्याच्या धावपळीच्या युगात अनेक आजारांनी थैमान घातले आहे. या आजारांचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर खेळा शिवाय पर्याय नाही म्हणून आपण दिवसभरातून दिनचर्येला जेवढे महत्त्व देतो तेवढेच महत्त्व खेळायला दिलं दिले पाहिजे असे प्रतिपादन तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष एस. पी. वाघ यांनी केले. ते उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. याप्रसंगी प्रा. ए. के. अग्रवाल,  डी. डी. राजपुत एन. डी. विसपुते, एस. आर. बोरसे, विनायक सूर्यवंशी उपस्थित होते.

 

अमळनेर येथे ११ते २०एप्रिल दरम्यान ऊन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर तालुका क्रीडा संकुल येथे स .६.३०वा. सुरुवात झाली. यावेळी तालुक्यातील १५० विद्यार्थी हजर होते. यांच्याकडून सकाळी रनिंग, एक्सरसाईज व शरीराच्या हालचाली करुन ,योगा, विविध खेळाचे प्रशिक्षण , एरोबिक्स, करुन घेण्यात आले. तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष एस. पी. वाघ यांनी खेळाचे मानवी जीवनातील महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. शारदा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक डी.डी राजपूत यांनी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग खेळासाठी करावा असे सांगितले.  माध्यमिक शाळेतील परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड व्हावी हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मागचा हेतू आहे.

 

Add Comment

Protected Content