यावल येथे पाठ्य-पुस्तके वाटपास सुरूवात

यावल प्रतिनिधी । येथील बाल संस्कार विद्या मंदीरातील इयत्ता पहिले ते सातवीच्या सहाशे पाच विद्यार्थ्यांना नवीन पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यास आजपासुन सुरूवात करण्यात आली.

या वेळी शाळेचे संस्था अध्यक्ष महेश वासुदेव वाणी व मुख्याध्यापिका सुवर्णा वाणी यांनी सर्व प्रथम युवकांचे प्रेरणास्थान थोर महापुरूष स्वामी विवेकांनद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून आदरांजली वाहुन अभीवादन करण्यात आले . यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थांना रांगेत ऊभे करून कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशाचे काटेकोर अमलबजावणी करीत सोशल डिस्टंसींग व मास्क चे  कटाक्षाने पालन करण्यात आले .लॉक डाऊनच्या गोंधळात मागील सहा महीन्यापासुन शाळाविद्यालय ही पुर्णपणे बंद असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये आपल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्याला घेवुन चिंतेचे सावट पसरले होते तथापी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळाल्यानं विद्यार्थी आनंदात दिसत होते . दरम्यान शाळेच्या वतीने विद्यार्थांना पुस्तकांचे वितरण पुढील काही दिवस सुरच राहणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिक सुवर्णा वाणी यांनी सांगीतले की विद्यार्थ्यांनी सकाळी आठ ते अकरा या वेळेत आपली जुनी पुस्तके शाळेत जमा करून नवीन पुस्तके घेऊन जाण्याचे त्यांनी आवाहन केले आहे . लवकरच विद्यार्थ्यांना ई – लर्नीग व वॉट्स अँप च्या माध्यमातुन शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी , मुख्याध्यापिका सुवर्णा वाणी , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने ऊपस्थीत होते .

Protected Content