पंतप्रधानांच्या ७२ व्या वाढदिवसाला ७२ युवकांनी केले रक्तदान

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने यावल येथे भाजपा युवा मोर्चा तालुका शाखेच्या वतीने विविध मान्यवरांच्या सहभागाने रक्तदान शिबीराचे कार्यक्रम संपन्न झाले. या शिबीरात ७२ युवकांनी रक्तदान केलेत.                               

यावल येथे आज शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती यावलच्या सभागृहात भाजपा युवा मोर्चाच्या तालुका शाखेच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबीराचे आयोजीत करण्यात आले होते.

या रक्तदान शिबीरास भाजपा युवा मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, अमोल हरि जावळे, यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी, माजी प्रभारी पंचायत समिती सभापती दिपक पाटील, युवा समाजसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,  भाजपाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपूत, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राकेश फेगडे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पवार, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे,  भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे, वड्रीचे सरपंच अजय भालेराव, अतुल भालेराव, कृउबाचे माजी संचालक उमेश पाटील, पं.स.चे माजी उपसभापती मोगेश भंगाळे,  उमेश बेंडाळे आदी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजीत भव्य रक्तदान शिबीरास युवकांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबीरातील ७२ व्या क्रमांकाचे शेवटचे रक्तदान माजी पं.स.सभापती दिपक अण्णा यांचे चिरंजिव शिवम पाटील यांनी केले.

या रक्तदान शिबीरास यशस्वी करण्यासाठी संजिवनी रक्तपेटीचे नितिन इंगळे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी व शिबीराचे आयोजक भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी, योगेश खेवलकर, शरद तायडे, व्यंक्टेश बारी, भुषण चौधरी, तुषार चौधरी, मयुर पाटील, परेश नाईक, योगेश चौधरी आदींनी महत्वाचे परिश्रम घेतले.

Protected Content