लायन्स क्लब आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | लायन्स क्लब अमळनेर व अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेतर्फे आयोजित तसेच खानदेश शिक्षण मंडळ व लिओ क्लब च्या सहकार्याने प्रताप महाविद्यालयातील रक्तदान शिबिरात १०० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. लायन्स क्लबचे प्रेसिडेंट योगेश मुंदडे यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला.

आज शनिवार, दि. १७ रोजी प्रताप महाविद्यालयात सकाळी ९.३० वाजता खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान अभियानाला सुरवात करण्यात आली. रक्त संकलनासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र जळगाव यांच्या टीमचे अनमोल सहकार्य लाभले.

यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल,प्रदीप अग्रवाल, डॉ.अनिल शिंदे, डॉ.संदेश गुजराथी, सेक्रेटरी प्रा.डॉ.अरुण कोचर, प्राचार्य शिरोडे, तसेच लायन्सचे सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनी, प्रोजेक्ट चेअरमन एमजेएफ विनोद अग्रवाल, बजरंगसेठ अग्रवाल, पंकज मुंदडे, प्रशांत सिंघवी, डॉ.मिलिंद नवसारीकर, प्रदीप जैन, येझदी भरुचा, प्रा.डॉ.जयेश गुजराथी, श्याम गोकलानी, मनीष जोशी, जितेंद्र जैन, गोटू गांधी, हेमंत पवार, जितू गोहिल, बाळू कोठारी, उदय शहा, कमलेश भंडारी, पंकज वाणी, प्रसन्ना जैन, डॉ.रविंद्र जैन, राजू नांढा, प्रसन्ना शहा, लिओ प्रेसिडेंट हरिओम अग्रवाल, कुशल गोलेच्छा, गौतम मुंदडा, निधीश कोचर, फलेश बोथरा, राज जैन उपस्थित होते. शिबिराला माजी आमदार स्मिता वाघ, जि.प.सदस्या जयश्री पाटील, भैरवी वाघ-पलांडे यांनी भेट दिली.

रक्तदानासाठी प्रताप महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, जि.एस.हायस्कूलचे शिक्षक, प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी, एन.सी.सी., एन.एस.एस.चे विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान तसेच शिबिरासाठी सहकार्य केले. यावेळी सहभागी रक्तदात्यांना लायन्स क्लबच्या वतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.लायन्स क्लब चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे यांनी रक्तदात्यांचे तसेच शिबिर आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

Protected Content