पाचोरा येथे संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील श्री. संताजी तेली युवक मंडळ व शहर तेली समाज मंडळाच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने २१ व २२ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्ताने बुधवार २१ रोजी सकाळी ८ वाजता शहरातुन दुचाकी रॅली, साडेआठ वाजता श्री. संताजी जगनाडे महाराज प्रतिमेचे पूजन व महापूजा, साडेनऊ वाजता जगनाडे महाराजांची पालखी मिरवणूक, रात्री नऊ वाजता ह. भ. प. खुशाल महाराज यांचे कीर्तन व गुरुवार दि. २ रोजी सकाळी साडेनऊ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व “भविष्याची वाटचाल” या विषयावर प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे मार्गदर्शन, दुपारी बारा ते तीन दरम्यान समाज बांधवांसाठी महाप्रसाद, सायंकाळी सहा वाजता बालकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे सर्व कार्यक्रम बाहेरपुरा भागातील चौधरी वाड्या जवळच्या तेली समाज मंगल कार्यालयात होणार असून समाज बांधवांनी उपस्थिती देण्याचे आवाहन अध्यक्ष नारायण चौधरी, उपाध्यक्ष डॉ. उत्तम चौधरी, सतीष चौधरी, शरद चौधरी यांचे सह विश्वस्त व कार्यकारी मंडळाने केले आहे.

 

Protected Content