नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता ! : अमृता फडणवीस

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमृता फडणवीस यांनी आपण ट्रोलर्सला घाबरत नसून मामी म्हटलं तरी फरक पडत नसल्याचे प्रतिपादन केले आहे. तर मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

नागपूर येथील अभिव्यक्ती वैदभीय लेखीका संघातर्फे अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी उपस्थितांच्या आरोपांना बिनधास्त-बेधडक उत्तरे दिलीत. त्या म्हणाल्या की सोशल मीडियातून मला ट्रोल करण्यात येते. मला मामी म्हणून हिणवण्यात येते. मात्र आपण याला घाबरत नसल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान, याप्रसंगी मोदींच्या वाढदिवशी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं माझं ठाम मत आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यांचे हे वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

Protected Content