तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आदीवासी विद्यार्थी चमकले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लीस मिडीयम स्कुलच्या वतीने तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा नुकतेच डोणगाव किनगाव रोडवरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या मैदानावर संपन्न झाले. या स्पर्धेत आदीवासी विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला.

स्कुलच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्दघाटन इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरूवातीस २६नॉव्हेबर या संविधान दिनानिमित्ताने सामुहीकरित्या शपथ घेण्यात आली.

यात १४ वर्षा आतील घेण्यात आलेल्या १०० मीटर धावणे स्पर्धेत रिलेश सखाराम बारेला ४०० मिटर धावणेत नरसिम्हा ठेमसिंग पावरा ६०० मिटर धावणे स्पर्धेत रोशन रमेश बारेला, नरसिम्हा हेमसिंग पावरा ८० मिटर हर्डस्स संजय रोहित बारेला, स्वप्निल सुभाराम बारेला थाळी फेकमध्ये विकास सुरेश पावरा, ४X१००मिटर रिलेमध्ये रोशन रमेश बारेला, संजय रोहित बारेला, अभिषेक जबरसिंग बारेला, रोहन शिवा पावरा यांनी यश मिळवले. तर १७ वर्षा आतील १५०० मिटर धावणे स्पर्धेत गितेश किशोर पाटील यांनी यश संपादन केले.

यावेळी केंद्रप्रमुख कविता गोहिल, प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील, उपप्राचार्य राजश्री अहीरराव, क्रिडा समन्वयक के.यु.पाटील, क्रिडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले, ललित अनंत बढे (अट्रावल), पंकज मोतीराम भंगाळे (सांगवी), संदीप सुनील मोरे (कोरपावली), दिलीप प्रल्हाद बोदडे (फैजपुर), निळकंठ चोलदास पाटील (अनोदे), दिनेश प्रभुदास माळी (साकळी), ज्ञानेश्वर लक्ष्मण चांदणे (साकळी), शरद रघुनाथ झांबरे (भालोद), हितेंद्र एकनाथ चौधरी (भालोद), आर.आय.तडवी(न्हावी), व्ही.व्ही.राजपूत(फैजपूर), जे.ए.फिरके (डांभुर्णी), डी.जी पाटील (दुसखेडा), ए.एस.काळकर(अकलुद), एस.एन.सोळूंके (चिंचोली), वाय.ए.सपकाळे (चिंचोली), नितीन अशोक बारी (यावल), वाय.वाय.पाटील (चुंचाळे), अबु सुफिमान युसूफ खान(साकळी), जुबेर शेख (यावल), सैय्यद मोहम्मद जरीफ(यावल) आदी उपस्थीत होते. या कार्येक्रमाचे सुत्रसंचालन सुहास भालेराव यांनी केले तर कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कुलच्या सर्व पथकाने म्हत्वाचे परीश्रम घेतले.

Protected Content