एरंडोल शहरात विविध ठिकाणी भारतीय संविधान दिन साजरा

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघाच्या वतीने ” भारतीय संविधान दिन ऑक्सफर्ड इंटरनॅशनल विदयालय एरंडोल येथे साजरा करण्यात आला.

त्या अनुषंगाने चित्रकला, निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्रीमती तळेकर, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एरंडोल ,विशाल श्रावण धोंडगे, दिवाणी न्यायाधीश, एरंडोल, मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग, अॅड. अजिंक्य काळे, अॅड. आकाश महाजन तसेच इतर विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पो.कॉ. धर्मेंद्र ठाकूर इ. उपस्थित होते.

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात
शहरातील येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र विभागामार्फत संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एन. ए. पाटील यांच्याहस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीचेही यावेळेस पूजन करण्यात आले.

प्रा.नरेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांना भारतीय संविधान याविषयी थोडक्यात माहिती दिली. तसेच या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, रजिस्टर श्री. गिरीश वेताळे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. एस. पाटील सर तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी नरेंद्र तायडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विजय गाढे, नितीन पाटील केंद्र संयोजक ,महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. शर्मिला गाडगे, तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व उपस्थित त्यांनी यावेळेस भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले व भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याची सर्वांनी याप्रसंगी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय गाडे यांनी केले.

फार्मसी महाविद्यालय
शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उप प्राचार्य डॉक्टर पराग कुलकर्णी यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रा.राहुल बोरसे यांचे समयोचीत संविधानाविषयी विचार मांडले सूत्रसंचालन प्रा. सुनील पाटील यांनी केले. दरम्यान यावेळी मुंबई येथील आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.

Protected Content