अतिवृष्टीमुळे शिष्यवृत्ती परिक्षा पुढे ढकलली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परिक्षा घेण्यात येते. यंदा २० जुलै रोजी होणारी परिक्षा ही अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता ही परिक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

दरम्यान, २० जुलैच्या परिक्षेचे प्रवेशपत्रच ३१ जुलै रोजीच्या परिक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

राज्यभरातील केंद्रांवर एकाचवेळी २० जुलै रोजी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थितीनुसार २० जुलै रोजीची परिक्षा रद्द करण्यात आली असून आता ही परिक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. असेही सांगण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.