एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील महेंद्रसिंह धर्मसिंह पाटील माध्यमिक विद्यालय, खडकेसिम येथील मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांची शिक्षक सेना एरंडोल तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
नियुक्तीप्रसंगी शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तथा नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, जळगाव जिल्हाध्यक्ष (माध्यमिक) रवींद्र चव्हाण, राज्य समन्वयक संभाजी पाटील तसेच जिल्हा सरचिटणीस (माध्यमिक) महेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा समन्वयक जगदीश पाटील, माजी सरपंच रविंद्र जाधव (जळू), जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजेंद्र पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षक संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासोबतच शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी भावना राजेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.



