पाचोरा येथे महायुतीचा विजय संकल्प मेळावा ( व्हिडीओ )

73ddfc9a b235 4a0f 8fc7 3283254ffbcb

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा व भडगाव तालुक्यातील भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा आज येथे आयोजित करण्यात आला होता. जळगांव लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना विजयी करण्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मतभेद विसरून कामाला लागावे व महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना प्रचंड मतांनी विजय मिळवून द्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. आमदार किशोर पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

मेळाव्याला पाचोरा भडगाव तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते, मात्र पाचोरा तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा अपेक्षित प्रतिसाद दिसून आला नाही. यावेळी शिवसेनेचे जि.प. सदस्य पद्मसिंग पाटील, रावसाहेब पाटील, माजी सभापती गणेश पाटील, भाजपचे राज्य परिषद सदस्य डी. एम. पाटील, सभापती सतीश शिंदे, युवा नेते अमोल शिंदे, भाजप जि. प. सदस्य मधुकर काटे, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, नगरसेवक शीतल सोमवंशी, प्रताप हरी पाटील, गंगाराम पाटील, मुकुंद बिल्दीकर, कृ. उ. बा. सभापती दिनकर देवरे, शेतकरी सेनेचे अरुण पाटील आदी उपस्थित होते.

 

 

 

Add Comment

Protected Content