कालबाह्य चालीरिती बंद करणार : गुजर समाजाचे प्रागतीक पाऊल !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे गुजर समाजाच्या झालेल्या बैठकीत कालबाह्य चालीरिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.

पाचोरा येथील ध्येय अकॅडेमी येथे गुजर समाज बांधव व भगिनींची बैठक संपन्न झाली. यात ८ एप्रिल रोजी रावेर येथे संपन्न झालेल्या समाज बांधवांच्या सभेमध्ये पारित झालेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयांचे काटेकोरपणे पालन करण्याचा ठराव सर्व संमतीने मंजूर करण्यात आला. यात समाजातील काही कालबाह्य चाली रीती बंद करण्याचा ठराव परीत करून समाजात आदर्श निर्माण केला असून या ठरावांचा काटेकोर पालन करण्यात यावे असे ठराव करण्यात आले.

दरम्यान, या सोबतच पुढील विषयावर देखील साधक-बाधक चर्चा संपन्न झाली. यात लग्न आहेर देणे-घेणे बंद, महीला वधुकडे हळद घेऊन जाणार नाही, रुपया घालण्यास महीला जाणार नाही, निधन घरी गावात व बाहेरगावी चहा साखर घेऊन बंद तसेच मुलीकडून गोड पदार्थ देणे बंद, साखरपुडा शक्यतोवर करूच नये केल्यास छोटेखानी मर्यादित लोकांपुरता करावा; यात साखरपुड्यास आलेल्या महीलांना साड्या देणे बंद, लग्नात सत्कार कार्यक्रम बंद, पत्रिका छापणे ते वाटायला जाणे तसेच घ्यावयास जाणे पद्धती बंद करून या ऐवजी सोशल मिडियाचा पुरेपुर वापर करावा असे निर्णय झाले.

यासोबत, पाचोरा तालुका व परिसरातील गावांमध्ये जाण्याचे निश्चित करण्यात आले असून गुर्जर समाजातील गावांमधील मान्यवर, बंधु-भगीनींशी चर्चा करून समाज बांधव व भगिनींची सभा घेण्याचे निश्‍चीत करण्यात आले. या संदर्भातील माहितीसाठी बी. के. पाटील ९२२६७३१०७८ आणि डॉ. अविनाश पाटील यांच्याशी ९९२३१६८१९९ या क्रमांकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे गाव पातळीवर सर्व संमतीने पारित झालेल्या या ठरावांचे पालन न करणार्‍या परिवारास त्यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गावातील समाज बांधवांचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचे एकमताने मंजूर करण्यात आले. याबैठकीस डॉ. जयंतराव पाटील, प्रकाश पाटील डॉ. स्वप्नील पाटील, संदीप महाजन, डी. एल. पाटील; पी. डी. पाटील, एस. सी. पाटील, विनोद पाटील, गोविंद पाटील, अतुल महाजन, प्रल्हाद पाटील, राजाराम महाजन, डॉ. अविनाश पाटील, आशिष पाटील, मनोज पाटील, जितेंद्र महाजन, दिपक पाटील, अशोक पाटील; ईश्वर देशमुख, बाबुलाल पाटील, गोविंद पाटील, प्रतिक महाजन, मेघा महाजन, ज्योती देशमुख, सुनिता पाटील, डॉ. सोनाली पाटील, सुवर्णा पाटील, डॉ. संगीता पाटील, रेखा महाजन, शितल महाजन, शितल पाटील, तृप्ती पाटील, स्वाती पाटील, अर्चना महाजन, स्वाती महाजन, संजीवनी पाटील उपस्थीत होते.

Protected Content