नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी २० व २१ एप्रिल, २०२३ रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्वसाधारणपणे १० वी व १२ वी ग्रॅज्युएट/आयटीआय सर्व ट्रेड/डिप्लोमा सर्व ट्रेड असे एकूण १४५ रिक्तपदे भरण्याविषयी कळविले आहे.

या मेळाव्याचा नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्त़पदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगिन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगिन करुन ॲप्लाय करावा.

काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content