पाचोरा प्रतिनिधी । राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या ८ दिवसात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्याकाकडुन तातडीने पंचनामे करून नुकसानीच्या निकषानुसार तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. आ.पाटील यांच्या “शिवालय” निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
या महिन्यात पाचोरा तालुक्याच्या वरील भागात जोरदार ढगफुटी झाल्याने नद्या नाल्यांना महापुर येवुन शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पाणी शिरल्याने पाचोरा – भडगाव तालुक्यातील सुमारे १२५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. काही पाणी शेतातुन खरडुन निघाल्याने जमिनी वाहुन गेल्या आहेत. सतत च्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिके कुजु लागली असुन अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय काही ठिकाणी जिवितहानी झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांची गुरे ढोरे वाहुन गेली असुन या भागात विज वितरण कंपनी, जिल्हा परिषद, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते वाहुन गेल्याने मोठे नुकसान होवुन अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. सतत पाऊस, ढगफुटी यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याने झालेल्या नुकसानीचे येत्या ८ दिवसात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्याकाकडुन तातडीने पंचनामे करून नुकसानीच्या निकषानुसार तातडीने मदत केली जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी पाहणी दौरा आटोपल्यानंतर आमदार किशोर पाटील यांचे “शिवालय” या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन माहिती दिली.
ना. दादा भुसे यांनी पहाटे नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आयोजित पत्रकार परिषदेस आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, मुकुंद बिल्दीकर, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, पद्मसिंह पाटील, प्रा. गणेश पाटील, रमेश बाफना, संजय (भुरा आप्पा) पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, उपजिल्हा प्रमुख अँड अभय पाटील, डॉ. भरत पाटील, प्रविण ब्राम्हणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, भडगाव येथील बाजार समितीचे प्रशासक युवराज पाटील, पं. स. सभापती डॉ. विशाल पाटील, माजी सभापती रामकृष्ण पाटील, भडगाव तालुका प्रमुख विलास पाटील, विजय पाटील, कांतीलाल पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, तहसिलदार कैलास चावडे, उप विभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, तालुका कृषी अधिकारी बी. बी. बोर्डे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.