कळमसरे येथील मयत हिराबाई भील यांच्या वारसास चार लाखाची मदत

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील मोतीलाल भील यांच्या पत्नी हिराबाई भिल यांचे जीर्ण झालेल्या सार्वजनिक शौचालयात शौचास गेल्या असता भींत पडून जागीच ठार झाल्या. त्यांच्या वारसास आज रोजी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत चार लाखांचा धनादेश आमदारांचा हस्ते सुपूर्द करण्यात आला.

आज ता.23 रोजी अमळनेर येथे तहसीलदार मिलिंद वाघ ,आमदार अनिल पाटील,नायब तहसीलदार योगेश पवार, श्याम अहिरे,कळमसरे  येथील सरपंच जगदीश निकम ,उपसरपंच जितेंद्र राजपूत,नगरसेवक भाईदास महाजन, दीपक पाटील दिनेश पाटील,विनोद सोनवणे,किशोर मालचे आदिंच्या उपस्थितीत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मयत  हिराबाई भील यांचे पती मोतीलाल भील यांना चार लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. आमदार अनिल पाटील यांनी याकामी या कुटुंबाला पाठपुरावा करुण मदत मिळवून दिल्याने मोतीलाल भील व त्यांच्या परिवाराने आमदार अनिल पाटील तहसीलदार मिलिंद वाघ तसेच स्थानिक प्रशासन व पत्रकार बांधव यांचे आभार मानले.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेच्या माध्यमातून यांनाही मदत

यावेळी तालुक्यातील आशाबाई बापू भिल(मांडळ),कविता सुक्रम वंजारी(डांगर),कन्हैयालाल काशीनाथ पाटील(वासरे),सुरेखा शाम कोळी(अमळगाव),कमलाबाई राजेंद्र भिल(शिरूड),शोभा ज्ञानेश्वर पाटील(अमळनेर), मंगलबाई सजन पाटील (खडके), जनाबाई शांताराम मोरे(अमळगाव),अलका अशोक मोरे (पातोंडा),अनिताबाई ईश्वर पाटील (मुंगसे)  मयतांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजारांचे धनादेश आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पाठपुराव्याने सुपूर्द करून वारसांना आर्थिक मदत कारण्यात आली.

 

Protected Content