लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी व पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

यावेळी आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेवक सुनिल खडके, नगरसेवक डॉ. विरेंद्र खडके, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, जीवन विकास केंद्राचे डॉ. विकास निकम, शिक्षक संजय सावळे, नगरसेवक अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, शंकर पाटील, मलकापुर येथील महिला बाल कल्याण समिती सभापती छाया पाटील, बी. टी. पाटील, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी उत्कृष्ठ फोटोग्राफीबद्दल शिंदाड येथील छायाचित्रकार संदीप बोरसे यांना उत्कृष्ठ छायाचित्र कार म्हणून सन्मानित करण्यात आले व समाजहितासाठी देणगी देणाऱ्यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. व सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Protected Content