पाचोऱ्यात उद्या कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांचा सत्कार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांचा उद्या १० नोव्हेंबर गुरुवारी सकाळी १० वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन को – अॉप बॅंकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक (भाईजी) राहणार आहेत. कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांचा सत्कार पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाइस चेअरमन विलास जोशी, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन सुरेश देवरे, संचालक दुष्यंत रावळ, डॉ. जयंत पाटील, प्रा. सुभाष तोतला, संजय कुमावत, प्राचार्य डॉ. गिरीष पाटील, प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, डॉ. जे. व्ही. पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content