Home राजकीय ठाकरेंचे सहकारी आजही मुख्यमंत्र्यांना भेटतात : या खासदाराचा दावा

ठाकरेंचे सहकारी आजही मुख्यमंत्र्यांना भेटतात : या खासदाराचा दावा

0
40


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांच्या गटातील आमदार आणि खासदार आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री-अपरात्री भेटत असल्याचा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून या संदर्भात टिव्ही-नाईन मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. यानुसार, खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाचे आमदारच नाही तर अनेक खासदारही अस्वस्थ आहेत. त्यामुळे हे आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री अपरात्री भेट घेत आहेत, असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर भाजपच्या मंत्र्यांनाही रात्री बेरात्री एकांतात भेटत असतात. हे अस्वस्थ आमदार सह्याद्रीवर येऊन भेटत असतात. मी स्वत: पाहिलं आहे. अनुभवलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

उध्दव ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार हे नाराज असून ते पक्षांतर करू शकतात अशी चर्चा अनेकदा होत असते. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी याबाबत अनेकदा दावे केले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, खासदार प्रतापराव जाधव यांच्या ताज्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound