किनगावातून मोटरसायकल लंपास

पोलीसात तक्रार दाखल

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव गावातुन आज्ञात चोरट्यांनी मामाची मोटरसायकल भाच्या घरून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली मिळालेली माहीती अशी, किनगाव खु॥ तालुका यावल येथील राहणार सरफराज युनुस पिंजारी वय २५ वर्ष यांने आपले मामा शेख नईम शेख सलमी पिंजारी राहणार आमोदा तालुका यावल यांची बजाज कंपनीची अंदाजीत ७ हजार रूपये किमतीची पॅलेटिना मॉडेलची काळया रंगाची एमएच १९ एटी८८५०या क्रमांकाची मोटरसायकल दिनांक ६ नोव्हेबर रोजी घरासमोर लावलेली असतांना रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार दिनांक ७ नोव्हेबर रोजी सकाळी समोर आला आहे. सरफराज पिंजारी हे नेहमी प्रमाणे पाणी भरण्यास बाहेर आले असता हा प्रकार दिसुन आला याबाबत पिंजारी यांनी तक्रार दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन,पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. सरफराज पिंजारी यांनी आपले मामा यांच्याकडुन ही मोटरसायकल शेतीच्या कामासाठी वापरण्यास घेतली होती त्यामुळे मामाची मोटरसायकल ही भाच्याच्या घरून चोरीस गेल्याचा हा प्रकार बोलला जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content