वडोदा येथे धावत्या रेल्वेतून पडून तरूणाचा जागीच मृत्यू

Sakari news

भुसावळ प्रतिनिधी । दिवाळीचा फराळ घेवून मामाच्या घरी रेल्वेने जात असतांना धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

साकरी येथील सागर प्रभाकर वारके वय 25 रा. साकरी ता. भुसावळ हा तरुण नाशिक येथे खाजगी कंपनीत नोकरीला असून दिवाळी सणानिमित्ताने तो साकरी गावी आला होता. बुधवारी सागरने त्याच्या गावातील मित्रांचे गेट टूगेदरही झाले तर दिवाळीच्या फराळ देण्यासाठी दुपारून तो रेल्वेने मलकापूर जाण्यासाठी निघाला मात्र वडोदा रेल्वे स्थानकाजवळ डुलकी लागल्याने तो रेल्वेतून पडला व जागीच ठार झाला. साकरी गावात ही बातमी धडकताच शोककळा पसरली. गुरुवारी सकाळी 10 वाजता शोकाकुल वातावरणात मृत सागरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्‍चात आई, वडील व दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.

Protected Content