जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एमआयडीसी सेक्टर- ए मधील परिसरात असलेल्या शासकीय सदनिकेतील परिसरातून अज्ञात चोरट्यांनी २ लाख रुपये किमतीचे पाणीपुरवठा साठी लागणारे लोखंडी व्हाल्व चोरून नेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की. जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील सेक्टर- ए मध्ये शासनाच्या मालकीचे लोखंडी व्हाल्व हे शासकीय कर्मचारी यांचे सदनिकेतील एका ठिकाणी ठेवण्यात आला होते. ४ नोव्हेंबर २०२२ ते २७ मार्च २०२३ या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी २ लाख रुपये किमतीचा वेगवेगळ्या साईजचे व्हॉल्व चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विभागाचे अधिकारी बिपिन उत्तमराव पाटील रा. महाबळ परिसर जळगाव यांनी सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक सुधीर सावळे करीत आहे.