वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले ; चालक ट्रॅक्टर सोडून पसार

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नागझिरी शिवारातील फाट्याजवळून अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडले. चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. या प्रकरणी सोमवार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नागझरी शिवारात असलेल्या गिरणा नदीतून अवैधपणे वाळू वाहतूक होत असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आपासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजून १५वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पथकाने कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. यावेळी ट्रॅक्टर चालक हा पोलीसांना पाहून ट्रॅक्टर सोडून पसार झाला होता. पोलीस कर्मचारी पोलीस नाईक मनोज पाटील यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केले आहे. पोलीस नाईक मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी साडेसात वाजता ट्रॅक्टर वरील अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.

Protected Content