गुजरात राज्य संघटकपदी राहुल राठोड यांची निवड

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणारी, बंजारा समाजच नाही तर त्याच बरोबर इतर समाजासाठी ही कार्य करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना म्हणजे बंजारा ब्रिगेड, आता महाराष्ट्रच नाही तर गुजरात राज्यातही आपली नवी सुरुवात करत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व संघटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता राहुल राठोड यांची गुजरात राज्याच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड, बंजारा शिक्षण सेवा अभियानाचे राष्ट्रीय प्रचारक रमेश महाराज, कार्यकारी समन्वयक भरत पवार व केंदीय समिती सदस्य डॉ. दिनानाथ पवार (जालना), डॉ. अरविंद पवार (जळगाव), डॉ. मुकेश पवार (हिंगोली), जयवंता राठोड (पुणे), विजय जाधव (मुंबई), हनुमंत पवार (बीड), सूर्यकांत राठोड (पुणे), नकुल जाधव (परभणी), मनोज राठोड (वाशीम) यांच्या सहमतीने गुजरात राज्य संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Protected Content