जिल्ह्यात कोरोना ओसरतोय; आज दिवसभरात १०६ रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात १०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २६१ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी.
जळगाव शहर-२६, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-७, अमळनेर-०, चोपडा-८, पाचोरा-५, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-११, जामनेर-८, रावेर-५, पारोळा-५, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर-३, बोदवड-२ असे एकुण १०६ रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४१ हजार २०९ रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३६ हजार १९० रूग्ण कोरोना मुक्त झाली आहे. तर २ हजार ४६१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण २ हजार ५५८ रूग्णंचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content