जळगावात रात्री महिलांची मशाल रॅली

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा महिला असोसिएशन व भूमाता ब्रिग्रेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जळगावात रात्री मशाल रॅली काढण्यात आली.

जळगाव जिल्हा महिला असोसिएशन भूमाता ब्रिग्रेड आणि भूमाता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जळगावात एक महिला रात्र हा एक अभिनव उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमाला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व महिलांनी मिळून शहरातील काव्य रत्नावली चौक ते शिवाजी महाराज संकुल पर्येंत हातात मशाल घेऊन रॅली काढण्यात आली. महिलांना आज पुरुषांच्या बरोबरी स्थान आहे महिलांना अनेक पुरस्कार दिले जातात त्यांचा सत्कार केला जातो पण या महिला नेहमी सात च्या आत घरात येतात त्यामुळे ही रॅली महिला सुरक्षिततेची असून महिला या रात्री देखील सक्षमपणे रस्त्यावर फिरू शकतात ही जाणीव त्यांना व्हावी म्हणून ही रॅली काढण्यात आली आहे असं तृप्ती देसाई म्हणाल्या. जागतिक महिला दिनानिमित्त महिला सप्ताह साजरा करण्यात येत असून यावेळी भव्य संगीत खुर्ची स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा टॉक शो महिला सक्षमीकरण प्रशिक्षण योग मार्गदर्शन असे कार्यक्रम राबविण्यात आले. जिल्हा असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बाल्दी व भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मशाल पेटवून रॅलीची सुरुवात केली. या रॅलीमध्ये अरिहंत मार्गी जैन महिला मंडळ, उन्नती राजपूत प्रतिष्ठान महिला मंडळ, परदेशी धोबी समाज महिला मंडळ, जैन महिला मंडळ, वनिता विश्‍व महिला मंडळ, लोहाना गुजराथी महिला मंडळ, सर्वधर्म समभाव महिला मंडळ, मैढ क्षत्रिय सोनार महिला मंडळ, तेलिक समाज महिला मंडळ, जागृती महिला मंडळांच्या सदस्या सहभागी झाल्या.

दरम्यान, या कार्यक्रमात कर्तबगार पुरूष आणि महिलांना सन्मानित करण्यात आले. यात महापौर सीमा भोळे, राजकुमार पाटील, अनंत सांगळे, प्रा. शालिग्राम पाटील, माधुरी टोणपे, नितीन विसपुते, भारती पाथरकर, माईसाहेब पाटील, वासंती दिघे या मान्यवरांचा समावेश होता.

Add Comment

Protected Content