अमळनेर प्रतिनिधी । सदगुरू संत सखाराम महाराज द्वि-शताब्दी समाधी सोहळ्यात सर्व अमळनेरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रसाद महाराज यांनी केले.
सदगुरू संत सखाराम महाराज द्वि-शताब्दी समाधी सोहळ्याच्या आयोजनाबाबत प.पू. प्रसाद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. चैत्र वद्य प्रतिपदा २०-४-२०१९ ते चैत्र वैद्य १० दिनांक २९ -४- २०१९ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संत श्री सखाराम महाराज समाधी शताब्दी महोत्सव समारंभ कार्यक्रम दिपप्रज्वलन व स्मरणिका प्रकाशन सोहळा परम पूज्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी, श्री परम पूज्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामीश्री सचिदानंद, परमपूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य ,परमपूज्य स्वामीश्री सागरनंदजी सरस्वती, परमपूज्य श्री वेदमूर्ती श्री गणेश्वर शास्त्री स्वामी द्राविड, श्री परम पुज्य गोविंद आदींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यानिमित्त विराट संत संमेलन होणार असून दुपारून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यासोबत १०८ कुंडी विष्णू पंचायतन महायज्ञ, गाथा पारायण कमीत कमी ५००० कर्त, प्रवचन व प्रबोधन किर्तन, रक्तदान ,शिबिर ,नेत्र शस्त्रक्रिया, अंध अपंग आधार ,वृक्ष लागवड व संवर्धन विद्यार्थी-विद्यार्थिनी निबंध स्पर्धा ,अन्नदान अशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एस.बी.येवले,जयंत मोडक यांनी दिली.
आमदार शिरीष चौधरी यांनीही संत सखाराम महाराज द्विशताब्दी सोहळ्यासाठी काही मदत लागली निश्चितच दिली जाईल असे सांगितले. याप्रसंगी परमपूज्य प्रसाद महाराज म्हणाले की या भव्य आणि दिव्य कार्यक्रमांमध्ये अमळनेर तालुक्यातील सर्व समाजातील राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकार बांधवांनी कार्यक्रमांमध्ये सेवा दयावी व कार्यक्रम यशस्वी करावा असे आव्हान करण्यात आले. दरम्यान, या सोहळ्यासाठी विविध समाजाकडून देणग्या देण्यात आल्या अहिर सुवर्णकार समाजाकडून पंचवीस हजार रुपये संत सखाराम महाराज द्विशताब्दी सोहळ्याला देण्यात येतील असे सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ नागरिक राजेंद्र पोतदार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत मोडक यांनी केले कार्यक्रमास एस.बी येवले, राहुल देशमुख, पवन शेटे ,दिनेश नाईक, बापू नागावकर, अनिल घासकडवी, प्रवीण पाठक, नितीन निळे, नगरसेवक संजय पाटील ,एडवोकेट परमार, अनिल महाजन यांच्यासह विविध समाजाचे पदाधिकारी शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
पहा : प.पू. प्रसाद महाराज यांनी केलेले आवाहन.