Home Cities अमळनेर अमळनेरच्या नेहा मुरलीधर महाजन (भंगाळे) यांना मॅथेमॅटिक्समध्ये पीएचडी प्रदान

अमळनेरच्या नेहा मुरलीधर महाजन (भंगाळे) यांना मॅथेमॅटिक्समध्ये पीएचडी प्रदान

0
77


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील माजी सरपंच मनिषा महाजन व माजी उपसरपंच मुरलीधर महाजन यांच्या कन्या नेहा मुरलीधर महाजन (भंगाळे) यांना मॅथेमॅटिक्स विषयामध्ये पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. नेहा महाजनच्या या यशामुळे कळमसरे परिसरात आनंदाचे वातावरण आहे आणि स्थानिक नागरिकांमध्ये अभिमानाची लाट पसरली आहे.

नेहा महाजन यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीही उल्लेखनीय आहे. त्या संकेत रामकृष्ण भंगाळे यांची पत्नी असून, जळगाव येथील नंदिनीबाई मुलींचे विद्यालयातील शिक्षिका जयश्री रामकृष्ण भंगाळे व निवृत्त लिपिक रामकृष्ण सिताराम भंगाळे यांची सुन आहे. या पीएचडीसाठी नेहा महाजन यांना मार्गदर्शन डॉ. नरेंद्र स्वामी यांनी केले, तर को-गाईड म्हणून कळमसरे येथील आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, चिखलदरा येथील प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

नेहा महाजन यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या पती संकेत रामकृष्ण भंगाळे यांनीही मॅथेमॅटिक्स विषय असल्याने यशस्वी मार्गदर्शन केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कळमसरेतील पहिली सुकन्या पीएचडी मिळविणारी नेहा महाजन (भंगाळे) असल्याने तीच्याबरोबर आई-वडील, पती, सासू-सासरे यांचेही कौतुक सर्वत्र होत आहे. स्थानिक समाजाने या यशाचे स्वागत केले असून, युवा पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.


Protected Content

Play sound