डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धा

जळगाव प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ब्रिगेडीयर अनंत नागेंद्र कमांडो रन मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस.आर्विकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आर.बी.गुप्ता, फार्मोकोलॉजी डॉ. बापूराव बीटे, नाक-कान-घसा तज्ञ डॉ. विक्रांत वझे, डॉ. विठ्ठल शिंदे, आशिष भिरूड, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रवीण कोल्हे, फिजिओथेरपीचे राहुल गिरी हे उपस्थित होते. एकूण पाच किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये संग्राम वाघ प्रथम, अनिरुध्द लहाडे द्वितीय, कृष्णा चव्हाण याने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींमध्ये सिध्दी धिंग्रा प्रथम, रूपाली ढोले द्वित्तीय, श्रेया जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला. प्राध्यापक कर्मचारी गटात प्रमोद भिरूड प्रथम, आशिष भिरूड द्वितीय, नर्सिंगचे प्रवीण कोल्हे तृतीय क्रमांकाने विजयी झाले. महिलांमध्ये योगीता गिरी यांनी प्रथम पटकविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.

Add Comment

Protected Content