जळगावात दोघांवर ब्लेडने वार

जळगाव प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्यामुळे एका तरूणाने दोघांवर ब्लेडने वार केल्याची घटना शहरात घडली.

विनोद गोंविदा बिर्‍हाडे (वय २२) व विकास वामन बिर्‍हाडे (वय २३, दोघे रा. पिंप्राळा हुडको) हे दोन तरुण सराफ बाजारातील गटारींमध्ये सोन्याचे कण शोधण्याचे काम करतात. रवी गोपाळ सोनवणे उर्फ ब्लेड रव्याने दारू पिण्यासाठी विनोद व विकास यांना पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्यामुळे त्याने खिशातून ब्लेड काढून दोघांवर वार केलेे. यात विनोद हा गंभीर जखमी झाला. सोबतच्या तरुणांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी रात्री उशिरा रव्याला ताब्यात घेतलेे. त्याने आधीही एकाला ब्लेड मारून जखमी केले होते.

Add Comment

Protected Content