पाडळसे येथे आरोग्यसेविका व आशा वर्कर यांचा सत्कार

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ . कुंदन फेगडे यांच्या वतीने आरोग्य सेविका व आशाताई यांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना संसर्गाच्या संकटमयकाळात उल्लेखनिय कार्याबद्दल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्यसेविका आणि आशाताई यांचा सत्कार करण्यात आला. या गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपाली चौधरी झोपे होत्या. कार्यक्रमाचे उद्धघाटन आश्रय फॉउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे होते. कार्यक्रमाचे समन्वयक आशा गट प्रमुख अर्चना सोनवणे , निलीमा ढाके आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते शिक्षणाच्या जननी, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. डॉ. कुंदन फेगडे यांनी आशा वर्कर ताईंना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी आशा गट प्रमुख निलीमा ढाके, अर्चना सोनवणे आशा वर्कर कल्पना बाविस्कर, मनीषा बाणाईत,पुष्पा पाटील, श्रद्धा पाटील, प्रगती पाटील, जयश्री भिरूड, रंजना कोळी, रेखा झांबरे, प्रतिभा बोंडे, विमल कोळी, निर्मला भंगाळे, सुनीता इंगळे, जयश्री सोनवणे, रंजना वारके, सोनाबाई कोळी , सराला जावरे, कुसुम पाटील, छाया बादशहा, सराला सपकाळे, रुपाली पाटील, रेखा सोनोवणे, सुनीता सपकाळे, रेखा तायडे, अनिता तायडे आदींची उपस्थिती होती.

Protected Content