व्दारका अन्नछत्रालयाचा प्रथम वर्धापन दिन साजरा

 

जामनेर, प्रतिनिधी । शहरात अन्नदानाचा सेवाभावी उपक्रम सर्वात प्रथम राबविणाऱ्या त्रिनेत्र गिताई सेवा संस्था जामनेर संचलीत व्दारका अन्नछत्रालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त एकलव्य नगरातील चिमुकल्यांना अन्नदानाचे वाटप मान्यवरांच्या उपस्थीतीत फिजीकल डिस्टन्सिंगचा नियम पाळून आज करण्यात आले .

मागील वर्षी २३ सप्टेंबर रोजी संस्थेची मुहुर्तमेढ रोवण्यात आली होती. व्दारका अन्नछत्रालयाच्या माध्यमातुन ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर जेवणाची पार्सल सेवा गरीब गरजवंतासाठी राबविण्यात आली. यासोबतच विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबविण्यात आले.

संस्थेला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्त जामनेर शहरातील एकलव्य नगरातील चिमुकल्यांना मसाला खिचडी व मिठाईचे वाटप करण्यात आली. ही खिचडी वाटप सामाजिक कार्यकर्ते तथा व्यापारी जितेंद्र बागरेचा, शेतकी संघाचे संचालक प्रकाश तेली, निर्भिड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल इंगळे, सावता सेना युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा माळी, दै. गावकरी पत्रकार अनिल शिरसाठ या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष पवन माळी, सचिव संतोष सराफ, उपाध्यक्ष जितेंद्र गोरे, संचालक मिलींद लोखंडे व पदाधिकारी उपस्थित होते.

अन्नदासाठी व्दारका अन्नछत्रालयाचे भोजन व्यवस्था प्रमुख गजानन डागवाले, सहकारी प्रकाश डागवाले, व्यवस्थापक देवेंद्र जैन यांनी कामकाज पाहिले.

Protected Content