चिंचोलीतील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथील २४ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

भुषण संतोष पाटील  (वय-२४) रा. चिंचोली ता. यावल असे मृत तरूणाचे नाव आहे.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चिंचोली येथील भुषण पाटील हा आईवडीलांसोबत राहत होता. अहमदाबाद येथे तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. गेल्या महिन्यापासून भुषण हा चिंचोली येथे आलेला होता. सोमवारी ४ जुलै रोजी सकाळी त्याचे आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी भुषण हा घरी एकटाच होता. घरात कुणीही नसतांना त्यांना राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकुलत्या एक मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच आईवडीलांना एकच आक्रोश केला होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content