शहरातील अक्सानगरात गुरांची कत्तल करून मांस बाळगणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अक्सानगरात परिसरात इक्बाल कॉलनीत गुरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या चार जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील अक्सानगर परिसरातील इक्बाल कॉलनीकडे जाणाऱ्‍या फुलाजवळ असलेल्या तैयबा मेडीकलच्या समोर असलेल्या पत्री शेड मध्ये शरीफ शेख उर्फ भोल्या रशीद शेख, वय 23 वर्षे, मोहम्मद इम्रान शेख रशीद शेख,वय -30 वर्षे, शेख आसीफ शेख रशीद वय – 29 वर्षे, नाजीम शेख रशीद वय – 28 वर्षे सर्व रा.अक्सा नगर,जळगाव ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बेकायदेशीर व विनापरवाना गुरांची कत्तल करून मांस विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विजय नेरकर, मुदस्सर काझी, विजय बावस्कर, भारती देशमुख यांनी करवाई करत गुरांची कत्तल केल्याचे निदर्शनास आले. चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, अक्सानगरातील नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येवून ठिय्या मांडला होती. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन यांनी नागरिकांची समजूत काढून शांत केले. यासाठी शेख फारुख शेख अब्दुल्ला, नगरसेवक रियाज बागवान, जिया बागवान, युसुफ शेख, जब्बार शेख कुरेशी अनिस शेख, सत्तार शेख, इमरान खान शेख, बाबुलाल कुरेशी, शेख सत्तार शेख गफूर अशांनी लोकांची समजूत काढण्यासाठी मदत केली.

सायबर सेल जळगाव मार्फत सोशल मिडीयावर सतत लक्ष ठेवण्यात आलेले आहे.सोशल मिडीयावर असे आक्षेपार्ह मजकुर , व्हिडीओ किंवा फोटो आल्यास तात्काळ डिलीट करावे. अथवा त्याबाबत माहिती पोलीसांना तात्काळ कळवावी. जळगाव पोलीस दल अशा माहिती प्रसार करणा-यावर लक्ष ठेवून आहेत. अशा प्रकारची चुकीची माहिती प्रसार करणा-यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची दक्षत घ्यावी.

Protected Content