मुंबईतील सर्व दुकाने आजपासून सुरू !

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत आज (दी.५) पासून सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. लॉकडाऊनमध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने सुरू होती. मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

 

राज्य सरकारने दुकाने सुरू करताना दुकानासाठी सम-विषम नियम लागू होता. त्यामुळे महिनाभरात १२ दिवस दुकाने खुली राहत होती. त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून कामगारांचा खर्च, दुकानाचे भाडे देणेही कठीण होते. त्यामुळे दोन्ही बाजूची दुकाने सातही दिवस खुली राहावीत यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. सर्व दुकाने खुली ठेवता येणार असल्याने साडेतीन लाख दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, महत्वाचं म्हणजे मद्यविक्रीच्या दुकानांचाही यात समावेश आहे. मद्य घरपोच देता येण्याची सुविधाही देण्यात आलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा महापालिकेनं दिला आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानंही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Protected Content