शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी एकाच खानदानाचे पक्ष – ओवेसी

0

अमरावती प्रतिनिधी । शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी हे एकाच खानदानाचे पक्ष असल्याचा आरोप करत आज एमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सर्व पक्षांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जी काही आश्‍वासने दिली होती त्यातलं एकही आश्‍वासन पूर्ण केलं नाही. दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार होते कुठे गेले रोजगार? १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार होते? कुठे आहेत पैसे? नोटाबंदीच्या निर्णयामुळे तर अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं. ही आणि अशी खोटी आश्‍वासनं देणार्‍या सरकारला खाली खेचा असे आवाहन त्यांनी केले. सध्या शिवसेना भाजपासमोर लाचार झाली आहे. मोदींसमोर मांजर झाली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार सोडाच कोणालाही तुरुंगात पाठवण्यात आलं नाही, कारण शिवसेना-भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी सगळे एकाच खानदानातले पक्ष असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!