मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधकपदी युवराज पाटील

जळगाव प्रतिनिधी। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधकपदी भुसावळ तालुक्यातीलच पिंपळगाव खुर्दचे असलेले मूळ रहिवासी युवराज पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे.

 

युवराज पाटील हे सन 2011 च्या भारतीय रेल्वे वाहतूक सेवेच्या ( आयआरटीएस ) तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी क्षेत्रीय प्रबंधक म्हणून धनबाद मंडळ ( झारखंड ), मंडळ पारिचालन प्रबंधक , मुगलसराय , मंडळ वाणिज्य प्रबंधक ( मुंबई ) , मंडळ पारिचालन प्रबंधक ( मुंबई ) , मध्य रेल्वे मुंबई मुख्यालयात वरिष्ठ वाहतूक प्रबंधक ( सर्वे ) म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी हाताळली होती. एक शिस्तबद्ध , प्रचंड मेहनती आणि हुशार अधिकारी म्हणून त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे. युवराज पाटील हे मूळचे भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्दचे रहिवासी आहेत .प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण घेत प्रगतीची झेप घेतली आहे .युवापिढीला नेहमी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेले असून त्यांच्या जीवनात त्यांना हे आघाडीचे मानाचे पद मिळाले असल्याने विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे .महाराष्ट्र राज्याच्या महसूल मंत्रालयाच्या विभागातील सहसचिव शामसुंदर पाटील यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत.

 

भुसावळ रेल्वे विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकपदी पदोन्नती झाल्याबद्दल युवराज पाटील यांचे लेवा गणबोली मंडळाचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते व कलावंत तुषार वाघुळदे , जेष्ठ साहित्यिक डॉ.नि.रा.पाटील , जनता शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.प्रभात चौधरी , नेहा वाघुळदे , डॉ.संजय चौधरी , सेवानिवृत्त रेल्वे प्रबंधक रुपचंद वाघुळदे , अंकिता झोपे आदींनी विशेष अभिनंदन केले आहे.

Protected Content