जळके येथील शेतकरी  अपघातात जागीच ठार

 

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील शेतकऱ्याचा रोड अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर नामदेव पाटील (वय 45 रा.जळके ता.जि.जळगाव) हे शेतकरी असून शेतीचे काम करतात. बुधवार 30 डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने जळके येथून वावडदा येथे कामाच्या निमित्ताने निघाले होते. जळके आणि वावडदा रस्त्या दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेल्या मुरूम आणि दगडाच्या ढीग अंधारात न दिसल्यामुळे ज्ञानेश्वर पाटील हे दुचाकीने थेट ढिगाऱ्यावर आदळले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जळके गावातील तरूण व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ जखमी ज्ञानेश्वर पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content