राज्यपालांची हकालपट्टी करा ; तृणमूलची मागणी 

 

कोलकाता, वृत्तसंस्था ।पश्चिम बंगालचे राज्यपाल व सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील वाद संपण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसून राज्यपाल घटनाबाह्य वर्तन करीत असल्याचा आरोप करून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसने पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे.

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे राज्य सरकार आणि प्रशासनाविरुद्ध नियमिपणे जाहीर भाष्य करून घटनात्मक मर्यादेचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तसेच धनखड यांना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी तृणमूलच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून केली आहे. ‘राज्यपाल धनखड यांनी अलीकडील काळात घटनात्मक मर्यादेचे कसे उल्लंघन केले याची यादीच आम्ही राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रामध्ये दिली आहे. त्यावरून घटनेच्या कलम १५६-१ अनुसार राज्यपालांवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती आम्ही राष्ट्रपतींना केली आहे’, असे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी पत्रकारांना सांगितले. ‘धनखड यांना काही सांगायचे असेल तर ते घटनेने दिलेल्या मार्गाने संवाद साधू शकतात, ट्वीट करून किंवा पत्रकार परिषद घेऊन नाही,’ असेही रॉय म्हणाले.

 

Protected Content