भाग्यलक्ष्मी हाॅटेलला आग – सुदैवाने जीवितहानी टळली (व्हिडिओ )

 

पाचोरा, प्रतिनिधी । शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंटला आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शाॅर्टसक्रीटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सविस्तर वृत्त असे की, सुशिल मराठे यांच्या मालकीच्या भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वारा जवळच असलेले किचन जळुन खाक झाले आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपालिकेचे सफाई मुकादम बापु ब्राम्हणे व त्यांचे सहकार्यांना सदरचा प्रकार लक्षात येताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तात्काळ न. पा. अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे राजु कंडारे, आबा पाटील, भिकन गायकवाड, युसुफ खान यांना आग विझविण्यात यश आले. सदरची घटना पहाटे घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली व किचन मध्ये असलेले गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढल्याने पुढील होणारा अनर्थ टळला. घटनास्थळी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी भेट देऊन घटनेविषयी माहिती जाणून घेतली.

Link : https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1660467777474947

Protected Content