राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी अरविंद सावंत

arvind sawant

मुंबई प्रतिनिधी । केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समिती या त्रिसदस्यीस समितीची स्थापना केली असून, या समितीचे अध्यक्षपद अरविंद सावंत यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या विविध प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील संसद सदस्यांची २७ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान, या बैठकीत राज्यासंबंधीच्या विविध प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समिती या नावाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. याचे अध्यक्षपद अरविंद सावंत यांना देण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.आज उद्धव ठाकरे यांनी त्यांना संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून नेमल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Protected Content