अखेर ‘त्या’ चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी अल्पवयीन मुलीविरोधात गुन्हा

dead ..........

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा हुडकोमधील चार वर्षाच्या मुलीचा मृतदेह संशस्पद आढळून आल्यानंतर तिला शेजारील १४ वर्षीय बालिकेने पाण्यात बुडवून मारून टाकल्याचा नातेवाईकांनी आरोप केला होता. अखेर याप्रकरणी शुक्रवारी त्या १४ वर्षीय बालिकेविरूध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पिंप्राळा हुडको येथे शाबीर शहा हबीब शहा हे कुटूंबीयांसह राहतात. ११ फेबु्रवारी रोजी सकाळी १०़३० वाजता शाबीर हे मेडीकलवर औषधी घेण्यासाठी गेले होते़ घरी परतल्यानंतर त्यांनी मुलगी अर्षीन शाबीर शाह (४) ही कुठे आहे अशी विचारणा पत्नी रिजवाना बी यांना केली. ती इथेच खेळत असेल अशी उत्तर मिळाल्यानंतर तिचा शोध घेण्यास सुरूवात केली़ परंतू, ती कुठेली मिळून आली नाही़ म्हणून वडील शाबीर यांन मस्जिदमध्ये जावून मुलगी हरविल्याबाबत पुकारा दिला व ती सापडल्यास तिला घरी सोडून द्यावे असे सांगितले. काहीवेळानंतर शाबीर घरी आल्यानंतर त्यांना त्यांचा मित्र वसिम हा त्यांच्या मुलीला खाद्यांवर घेवून येताना दिसून आला़ नंतर तिला रूग्णालयात नेण्यात आले़ त्यावेळी तिचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी सांगितले. प्राथमिक अहवालात अर्षीन हिचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले.

पुन्हा टाकले जिन्यात
दरम्यान, शेजारी राहणाऱ्‍या जनबाई भोई यांच्या घरी अर्षीन हिचा मृतदेह हा तुमच्या शेजारी राहणारे अरबाज (नाव बदलेले) यांची १४ वर्षीय मुलीने आणला होता. तिला मृतदेह हा घराच्या जिन्यामध्ये सापडला. मात्र, तिने पुन्हा अर्षीन हिला जिन्यात टाकून दिले होते, अशी माहिती मित्र वसिम यांनी मयत बालिकेच्या वडीलांना दिली. त्यातही तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार अहवालातून समोर आला. त्यामुळे ज्या बालिकेला जिन्यात मृतदेह आढळून आला तिनेच ड्रममध्ये मुलीला बुडवून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता़ त्यानुसा संशयितांची रामानंदनगर पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली होती.

Protected Content