आयएफएससी सेंटर गुजरातला हलविल्यास देशाचे मोठे आर्थिक नुकसान : शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईलाच ठेवा. हे सेंटर गुजरातला हलविल्यास देशाचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईची पतही घसरेल, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.

 

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आयएफएससी सेंटर गुजरातच्या गांधीनगरला हलविण्यास विरोध केला आहे. आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला हलविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोध करतांना म्हटलेय की, केंद्राचा हा निर्णय निराशजनक आणि मुंबईचे महत्त्व कमी करणारा आहे. सेंटर गुजरातला हलविल्यास देशाचं मोठं आर्थिक नुकसान होईल,असेही त्यांनी म्हटले आहे.

Protected Content