धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीच्या मतदानास प्रारंभ

धरणगाव प्रतिनिधी । येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष पोट निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे.

गत निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आलेले सलीमभाई पटेल यांच्या अकाली मृत्यूमुळे धरणगाव येथे लोकनियुक्त निवडणूक घेण्यात आली. यात शिवसेना व काँग्रस महाआघाडीतर्फे निलेश सुरेश चौधरी, राष्ट्रवादीतर्फे निलेश भागवत चौधरी, भाजपतर्फे मधुकर माळी (रोकडे) या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होत असून रिंगणात अपक्षांनीही रंगत भरली आहे. सर्व उमेदवारांनी आपापल्या परीने जोरदार प्रचार केला.

दरम्यान, आज सकाळी सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला असून निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी होणार आहे.

Protected Content