चाळीसगाव येथे चित्रकला कार्यशाळेचे उद्घाटन

chalisgaon chitrakala news

चाळीसगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ चाळीसगावतर्फे जगविख्यात चित्रकार कलामहर्षी केकी मुस यांच्या स्मृतीदीनानिमित्त आज रविवारी २९ रोजी कै. सौ. सुवर्णाताई उद्यानात चित्रकला कार्यशाळाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यशाळेत सोप्या पद्धतीत रेखांकन ,रंग भरण्याचे विविध सोप्या पद्धती, निसर्गचित्र स्केचिंग, डिझाईन या विषयाचे चित्रकार धर्मराज खैरनार , चित्रकार सादिक शेख, चित्रकार अमोल येवले, चित्रकार अमोल रोजेकर, चित्रकार सागर मोरे, चित्रकार मनोज पाटील हे उद्यान परिसरात प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत उपस्थित राहणाऱ्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना रोटरी क्लब तर्फे बक्षिसे देण्यात येतील. जास्तीत जास्त बालचित्रकार व कलाप्रेमींनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख, रोशन तातेड, नरेंद्र शिरोडे, स्वप्निल कोतकर यांनी केले आहे.

Protected Content