धरणगाव नगरपालिका पोटनिवडणुक : पहिल्या दोन तासात ७ टक्के मतदान

jc8kolng evm and vvpat 625x300 20 March 19

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालीय. पहिल्या अवघ्या दोन तासात ७ टक्के मतदान झाले आहे.

 

रणगाव नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत ७ टक्के मतदान झाले होते. नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या या नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपसह राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून नीलेश सुरेश चौधरी, भाजपकडून मधुकर बन्सी माळी तर राष्ट्रवादीकडून नीलेश भागवत चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हाजी शेख इब्राहिम उमेश, जानकीराम माळी, संजय एकनाथ माळी, महेंद्र सुभाष पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसह चार अपक्ष असे एकूण सात उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रचाराच्या माध्यमातून सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेणे, तसेच कॉर्नर सभांच्या माध्यमातून मतदारांसमोर आपापली भूमिका मांडली होती. दरम्यान, शिवसेना-कॉंग्रेस आघाडीकडून माजी मंत्री गुलाबराव पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी.पाटील यांनी सभा गाजवली. तर राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारक अमोल मिटकरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी प्रचाराची धुरा सांभळली होती. भाजपकडून संजय महाजन, शिरीष बयस, कैलास माळी यांनी रणनीती आखली.

Protected Content